कोलवडी – साष्टे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रत्नमाला राजेंद्र मदने यांची बिनविरोध निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील कोलवडी – साष्टे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रत्नमाला राजेंद्र मदने यांची बिनविरोध निवड झाली. कोलवडीचे सरपंच सुरेखा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. त्रिशला नितनवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर झालेल्या उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. ग्रामसेवक निवडणूक निर्णय आधिकारी पी.बी.वेताळ यांनी काम पाहिले.

यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी जेष्ठ संचालक तुकाराम पवार, अर्जुन मदने, बाजीराव भालसिंग, सुभाष उंद्रे, दत्ता उंद्रे, सतिश गायकवाड, राजेंद्र भालसिंग, दिलीप उंद्रे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत मदने, विशाल मदने आदी उपस्थित होते.
गावाच्या सर्वागीण विकास कामासाठी प्राधान्य देईल नवनिर्वाचित उपसरपंच मदने यांनी सांगितले.

Previous articleसंरक्षित प्राण्यांच्या यादीतून ‘बैल’ हा प्राणी वगळण्याची खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे मागणी
Next articleराष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आण्णासाहेब महाडिक यांच्या पत्नी शिंदवणे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मनिषा महाडिक तर उपसरपंचपदी सारिका महाडिक