बियर बार चालू करायचा असेल तर दोन लाख दे नाही तर आरटीआयचा अर्ज करेल अशी धमकी देणाऱ्यांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Ad 1

प्रमोद दांगट निरगुडसर

तुला बियर बार हॉटेल माझ्या बिल्डिंग मध्ये चालू करायचे असेल तर दोन लाख रुपये दे नाहीतर मी कोण आहे तुला सांगतो तुझा आरटीआय चा अर्ज करतो अशी धमकी देऊन दोन लाख रुपये मागितल्याप्रकरणी ऋषिकेश जगदीश फुलसुंदर ( रा. नारायणगाव ता. जुन्नर जिल्हा पुणे व आरटीआय कार्यकर्ता हरीश महादू कानसकर ( रा.रांजनी.ता.आंबेगाव ) यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की मंचर येथील बियर बार व्यवसायिक यांचे मंचर येथे नवीन बियर बार दुकानाचे काम सुरू असून दिनांक ७/२/२०२१ रोजी बियर शॉपी मालकाला जगदीश फुलसुंदर यांनी फोन करून तू कुठे आहेस तुला नवीन बियर बार हॉटेल माझे बिल्डिंग मध्ये चालू करणार आहेस ते चालू करणार असेल तर मला पैसे द्यावे लागतील मी कोण आहे तुला माहित आहे का मी आरटीआय कार्यकर्ता हरीश कानसकर चा मित्र आहे नवीन बियर बार कसे चालू करतो ते मी पाहतो तू मला त्याकरिता दोन लाख रुपये द्यावे लागतील दिले नाही तर तुला आम्ही बियरबार हॉटेल चालू करू देणार नाही मी माझ्या पद्धतीने बघतो अशी धमकी दिली या अगोदर देखील ऋषिकेश फुलसुंदर व हरीश कानसकर यांनी वेळोवेळी पैशाची मागणी केली असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले आहे.तसेच बियर शॉपी गाळामालक यांनाही फुलसुंदर याने फोन करत मी कोण आहे तुम्हाला दाखवतो असे म्हणून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. याबाबत बिअर शॉपी मालकाने मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर खबाले करत आहे.