कै.पांडुरंग पवळे ( गुरुजी ) यांच्या ५ व्या पुण्यस्मरणार्थ पवळे परिवाराकडुन गरजु कुटुंबाना किराणा वाटप

राजगुरुनगर – वाकळवाडी येथील पवळे परिवारातील कै. पांडुरंग तुकाराम पवळे गुरुजी यांच्या पाचव्या स्मरणार्थ थिगळस्थळ येथील कातकरी समाजातील अतिशय गरजु कुटुंबास व वाफगाव गुळाणी रोडवरील जऊळके खुर्द येथील ठाकरवाडीतील दोन कुटुंबाना एक महिन्याचा किराणा देण्यात आला.

हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातुन या दोन कुटुंबाची परिस्थितीची माहीती कळताच पवळे परिवारातील श्रीमती कल्पना पांडुरंग पवळे ( पत्नी), श्री .योगेश पांडुरंग पवळे (मुलगा), तसेच सौ.वृषाली योगेश पवळे (सुन) यांच्या वतीने ही मदत पोहोचवण्यात आली.

जऊळके खुर्द ठाकरवाडी येथील पिंटु रामदास गावडे यांच्या घराला आग लागल्यामुळे त्या कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे किराणा स्वरुपातील तात्काळ मदत त्या ठिकाणी पोहोचवल्याचे समाधान पवळे कुटुंबीयास मिळाले तसेच हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे त्यामुळेच ही मदत केल्याची भावना योगेश पवळे यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी पवळे परिवारासोबत सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रेखा रौंधळ -थिगळे तसेच हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे संस्थापक कैलासभाऊ दुधाळे उपस्थित होते..

Previous articleचाकण आळंदी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश फलके, उपाध्यक्षपदी शरद भोसले यांची निवड
Next articleबियर बार चालू करायचा असेल तर दोन लाख दे नाही तर आरटीआयचा अर्ज करेल अशी धमकी देणाऱ्यांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल