चाकण आळंदी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश फलके, उपाध्यक्षपदी शरद भोसले यांची निवड

चाकण : खेड तालुका पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या चाकण – आळंदी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी चाकणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत निवडण्यात आली.

चाकण आळंदी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे गणेश फलके, उपाध्यक्षपदी दैनिक लोकमतचे शरद भोसले, सचिवपदी दैनिक लोकमतचे भानुदास पऱ्हाड, सहसचिवपदी पुणे लाईव्ह न्यूजचे प्रफुल्ल टंकसाळे, कार्याध्यक्षपदी दैनिक लोकमतचे विजय मुऱ्हे, सहकार्याध्यक्षपदी दैनिक प्रभातचे दत्ता बुट्टे, खजिनदारपदी दैनिक लोकमतचे आदेश टोपे, सहखजिनदारपदी दैनिक पुण्यनगरीचे अशोक टिळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.तर सल्लागार म्हणून खेड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे, रुपेश बुट्टे यांच्यासह दैनिक लोकमतचे चंद्रकात मांडेकर, दैनिक पुढारीचे ए.पी.शेख यांची निवड करण्यात आली आहे. चाकण व आळंदी परिसरातील वीस पत्रकारांना पत्रकार संघाचे सदस्यत्व देण्यात आले आहे.

Previous articleजमीन मालकाला मयत दाखवुन केली दस्तनोंदणी ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Next articleकै.पांडुरंग पवळे ( गुरुजी ) यांच्या ५ व्या पुण्यस्मरणार्थ पवळे परिवाराकडुन गरजु कुटुंबाना किराणा वाटप