आष्टापूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कविता जगताप तर उपसरपंचपदी विकास कोतवाल बिनविरोध

अमोल भोसले,उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील आष्टापूर ग्रामपंचायतवर जिल्हा परिषदेच्या सदस्या कल्पना सुभाष जगताप गटाचे वर्चस्व. आष्टापूर गावच्या सरपंचपदी कविता जगताप तर उपसरपंचपदी विकास कोतवाल यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच व उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने मंडल आधिकारी – निवडणूक निर्णय आधिकारी दिपक चव्हाण यांनी सरपंचपदी कविता जगताप व उपसरपंचपदी विकास कोतवाल यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

ग्रामविकास अधिकारी ज्योत्सना बगाडे यांनी सहाय्य केले. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सन्मान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, जिल्हा परिषदेच्या सदस्या कल्पना सुभाष जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांनी केला. गावाच्या सर्वागीण विकास कामासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे नवनिर्वाचित सरपंच कविता जगताप ,उपसरपंच विकास कोतवाल यांनी सांगितले. वाघोलीचे युवा उद्योजक रामकृष्ण सातव पाटील यांनी आपली बहिण कविता जगताप सरपंचपदी विराजमान झाल्याने इनोव्हा गाडी बहिणीला भेट दिली.

Previous articleसिमेंटचा खांब पडून एकाचा मृत्यु
Next articleवाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश लांडगे यांची बिनविरोध निवड