सिमेंटचा खांब पडून एकाचा मृत्यु

Ad 1

सिताराम काळे, घोडेगाव

– श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नविन घराचे बांधकामाला पाणी मारण्यासाठी गेलेले दुंदा लोहकरे यांच्या डोक्यावरती बांधकामाचा एक जुना सिमेंटचा खांब पडून मृत्यु झाला असल्याची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्यात सुदाम लोहकरे यांनी दिली.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे हॉटेल नितीनचे शेजारी लॉजींगचे जुने बांधकाम पाडण्याचे व नविन बांधकाम करणेचे काम चालू आहे. दि. ९ रोजी सकाळी ६ वाजण्याचे सुमारास दुंदा भागुजी लोहकरे (वय-६५) बांधकामाला पाणी मारत असलेल्या बांधकामाचा एक जुना सिमंेटचा खांब त्यांचे डोक्यावर पडला. त्यांना तात्काळ वैदयकीय उपचारासाठी तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांना तपासून पुढील उपचारासाठी रूग्णवाहीकेने घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात आणले. घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी जखमी लोहकरे यांना तपासुन दु. १२.३५ वाजता मृत्यु झाल्याचे घोषित केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार जिजाराम वाजे करत आहे.