सासवड येथे १२ मार्च रोजी राज्यस्तरीय बारावे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन

वाढदिवसाच्या जाहिरात

अमोल भोसले,उरुळी कांचन

जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित राज्यस्तरीय बारावे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन दि. १२ मार्च २०२१ रोजी सासवड (ता. पुरंदर) येथे होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्यसंयोजक प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांनी सांगितली.

संमेलनाच्या संयोजन बैठकीला परिषदेचे राजाभाऊ जगताप, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, श्यामकुमार मेमाणे, सुनील लोणकर, गंगाराम जाधव, नंदकुमार दिवसे, दत्ता कड, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक सुनील धिवार, विजय तुपे, अमोल भोसले, संजय सोनवणे, सुरेश वाळेकर, संतोष जवळकर आदी उपस्थित होते.

क-हा काठावर दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात ग्रंथदिडी, उदघाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महत्वपूर्ण भुमिका बजावलेल्या या परिसरात पुरंदर किल्ल्यावर संभाजीराजांचा जन्म झाला. सात गड आणि नऊ घाटांचा ही शंभर चौरस मैलाची क-हेपठारची दौलत आजही दिमाखात उभी आहे. संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक संभाजीराजे यांचे काम समाजासमोर यावे, यातून युवकांना प्रेरणा मिळावी असा उद्देश ठेवूनच संमेलनाचे आयोजन केले जाते. संमेलनात सहभागी होणा-या कवी,लेखकांनी ९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन राजाभाऊ जगताप यांनी केले .

Previous articleशिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वकील सेलच्या अध्यक्षपदी अँड.प्रदिप बारकर यांची निवड
Next articleनिघोज ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांचे अपहरण