उसने पैसे दिले नाही म्हणून मावस बहिणीने बहिणीला फेकून मारली इस्त्री

प्रमोद दांगट , निरगुडसर

मावस बहिणीला उसने दिलेले पैसे मागण्यांसाठी गेल्यानंतर झालेल्या वादातुन शिवीगाळ करत पैसे दिले नाही म्हणून मावस बहिणीनेच बहिणीला डोक्यात इस्त्री फेकून मारल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद अनिता रमेश बढेकर ( वय ३१ रा.मंचर ता.आंबेगाव ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक ३/२/२०२१ रोजी फिर्यादी बढेकर या घरी काम करत असताना त्यांची मावस बहीण सुरेखा दत्तात्रय गाडगे ( रा.पिंपळे गुरव पुणे ) व मावशी कमल किसन घोडेकर ( रा.सायगाव ता. खेड या फिर्यादी बढेकर यांच्या घरी आल्या त्यावेळी फिर्यादी ची मावस बहिण सुरेखा हिने मी दिलेले पैसे मला परत दे असे म्हणाली तेव्हा फिर्यादि आता माझ्याकडे पैसे नाही मी दोन-तीन दिवसात पैसे देईल असे म्हणाली असता सुरेखा व तिची आई कमल यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली.त्यावेळी सुरेखा हिने माझ्या कडून पैसे घेऊन माझ्या वरच रुबाब करते का ? असे म्हणत टेबलावरील इस्त्री अनिताला डोक्यात फेकून मारली व कमल फिर्यादीच्या हाताला चावली. यावेळी सुरेखा व तिची आई कमला हिने फिर्यादीस आमचे पैसे दिले नाही तर तुझ्याकडे बघून घेऊ असे म्हणत म्हणाले याबाबतची फिर्याद अनिता बढेकर हिने मंचर पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पो.ना.हिले करत आहे

Previous articleवाघाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या
Next articleशेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना चाळीसगाव येथून पोलिसांनी केली अटक