वारकरी सेवा फाउंडेशनची खेड तालुका कार्यकारिणी जाहीर

Ad 1

राजगुरूनगर – खेड तालुक्यातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायक,व वारकरी साधकांनी एकत्रित येऊन समाजसेवेसाठी पुढाकार घेऊन वारकरी सेवा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी व लोकहिताची कामे हाती घेण्यात आली आहेत.
वारकरी सेवा फाउंडेशनच्या वतीने नुकतेच रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली तसेच वारकरी निधी अर्बन लि. या बँकेची स्थापना करण्यात आली आहे तसेच येणाऱ्या काळात माफक दरात सेवा देणारा दवाखाना उभारणीचा संकल्प फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे.

वारकरी सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेचा शाखा विस्तार करण्यासाठी खेड तालुक्यात चैतन्य मंगल कार्यालय पांगरी येथे सदस्यांची नियुक्तीपत्र देऊन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली .ह.भ.प गिरीश महाराज शेंडे यांची वाङमय संशोधन कमिटी महाराष्ट्र राज्य सदस्यपदी,तुकाराम महाराज पांचाळ प्रदेशाध्यक्ष गुणवंत कलाकार संघ, विठ्ठल दादा पारखी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष ,ह भ प बिपिन महाराज कोरडे पुणे जिल्हा सहकार्याध्यक्ष, सागर महाराज शिर्के पुणे जिल्हा युवक सहकार्याध्यक्ष,बजरंग महाराज गावडे पुणे जिल्हा कलाकार उपाध्यक्ष,मंगेश महाराज शिंदे खेड तालुका अध्यक्ष, धनंजय महाराज रौधळ कार्याध्यक्ष,सागर महाराज गोरडे युवक अध्यक्ष,गणेश महाराज खंडागळे युवक कार्याध्यक्ष, शांताराम महाराज पाटोळे सचिव, सुरेश महाराज करवंदे खजिनदार, सौरभ महाराज गाढवे युवक सचिव, मोहन महाराज बारणे युवक उपाध्यक्ष, दीपक महाराज चव्हाण गुणवंत कलाकार कार्याध्यक्ष, किशोर गिलबिले प्रसिद्धी प्रमुख, विठ्ठल महाराज झोडगे कार्यकारिणी सदस्य,भरत बुट्टे पा टिल सचिव, शांताराम महाराज पाटोळे सहकार्याध्यक्ष यांना राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग महाराज शितोळे, प्रमुख विश्वस्त लक्ष्मण महाराज पाटील,राष्ट्रीय प्रवक्ते आचार्य योगी गणेशनाथजी शास्त्री,राष्ट्रीय खजिनदार योगी दत्ताजी यादव,सहसचिव प्रवीण महाराज लोळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

फाउंडेशनचे सहकार्याध्यक्ष भरत महाराज थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.यावेळी खेड तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी मोठया संख्येने उपस्थित होते