स्व.नामदेव चव्हाण यांच्या स्मरणार्थ द्वारका वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिकांना अनिता पाटील/ मोरे यांच्या कडून नित्योपयोगी किराणा भेट

राजगुरूनगर- महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर संस्था ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट च्या प्रमुख विश्वस्त सौ.अनिताताई पाटील-मोरे यांनी त्यांचे स्वर्गीय आजोबा श्री.नामदेव य. चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ कनेरसर (ता.खेड) येथील द्वारका वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिकांना ७ एअर बेड मॅट्रेस तसेच गहु,तेल,साखर सह सर्व नित्योपयोगी किराणा सामान भेट दिले .

अनिता पाटील यांनी भविष्यातही वृद्धाश्रमास काही गरज लागल्यास वेळोवेळी मदत करु असे वृद्धाश्रमाचे संचालक कल्याणीताई पवार यांना आश्वासन दिले.

समाजातील वंचित घटकांना,निराधारांना मदतीचा हात देणाऱ्या मा.सौ.अनिताताई पाटील/ मोरे परिवाराचे द्वारका वृद्धाश्रम परिवार सदैव ऋणी राहील.असे कल्याणीताई पवार यांनी सांगितले

Previous articleनारायणगाव येथे शिवसेनेचे पेट्रोल डिझेल गँस दरवाढी विरोधात आंदोलन
Next articleरिंग रोडच्या नावाखाली भूमिपुत्रांना भूमिहीन करण्याचा सरकारचा डाव- अतुल पवळे