नारायणगाव येथे शिवसेनेचे पेट्रोल डिझेल गँस दरवाढी विरोधात आंदोलन

नारायणगाव (किरण वाजगे)

केंद्र शासनाने पेट्रोल डिझेल गॅस चे दर तात्काळ कमी न केल्यास यापुढे शिवसेना स्टाईलने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव आंदोलन यांनी नारायणगाव येथे दिला.
शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीने पेट्रोल डिझेल गँस च्या दरवाढी विरोधात नारायणगाव बस स्थानकासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आढळराव पाटील बोलत होते.

या आंदोलन प्रसंगी जिल्हा समन्वयक संभाजी तांबे,तालुका प्रमुख माऊली खंडागळे, उपतालुका प्रमुख मंगेश काकडे, सह्याद्री भिसे, जुन्नर बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, पंचायत समितीचे उपसभापती रमेश खुडे, सरपंच योगेश पाटे, शहर प्रमुख संतोष वाजगे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे, रोहिदास तांबे, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप वाजगे, रशिद इनामदार, रामदास बाळसराफ, बाजार समितीचे माजी संचालक आनंद रासकर, सरपंच संतोष मुळे, महेश शेळके, रोहिदास भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष दांगट, राजेश बाप्ते, आरीफ आतार, गणेश पाटे, अनिल गावडे, तसेच अनेक ज्येष्ठ शिवसैनिक,शाखाप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी केंद्रशासनाच्या पेट्रोल व गॅस दरवाढीविरोधात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, उपतालुकाप्रमुख सह्याद्री भिसे, सरपंच योगेश पाटे, रशिद इनामदार आदींनी तीव्र शब्दात केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला.
या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी या वेळी वाहतूक सुरळीत करण्यास परिश्रम घेतले. व चोख बंदोबस्त ठेवला.

Previous articleघोडेगाव एसटी बसस्थानकातील स्वच्छतागृह झाडाझुडपांच्या विळख्यात
Next articleस्व.नामदेव चव्हाण यांच्या स्मरणार्थ द्वारका वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिकांना अनिता पाटील/ मोरे यांच्या कडून नित्योपयोगी किराणा भेट