घोडेगाव एसटी बसस्थानकातील स्वच्छतागृह झाडाझुडपांच्या विळख्यात

सिताराम काळे

घोडेगाव (ता. आंबेगाव) एसटी बसस्थानकातील स्वच्छतागृह शासकीय लाखो रूपये खर्च करून सुमारे चार वर्षांपासून झाडाझुडपांच्या विळख्यात बंद अवस्थेत आहे. स्वच्छतागृह बंद असल्याने बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना नैसर्गीक विधीसाठी जायचे कुठे? हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी एसटी महामंडळाने स्वच्छतागृह त्वरीत सुरू करावे, अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे यांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्यातील तहसिल कार्यालय, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, वनविभाग आदि शासकीय कार्यालये व महाविदयालय घोडेगाव या ठिकाणी आहेत. यामुळे या बसस्थानकात नागरिकांची कायम गर्दी असते. घोडेगाव पासुन पुढे पश्चिमेकडे बारा ज्योर्तिलींगापैकी सहावे असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर, आहुपे या सुमारे ६५ किमी अंतर असलेल्या परीसरातील ६० गावांच्या व लगतच्या वाडयावस्त्यांची घोडेगाव हिच मुख्य बाजारपेठ असल्याने मोठया प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची ये-जा असते.

घोडेगाव बसस्थानकातील स्वच्छतागृह बंद असल्याने या ठिकाणावरून प्रवास करणा-या सर्वच प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वच्छतागृह बंद असल्याने बसस्थानकाच्या पाठीमागील मोकळया जागेतच पुरूष प्रवासी नैसर्गीक विधी करताना पहावयास मिळत आहे. तर महिला व महाविदयालयीन विदयार्थीनींनी जायचे कुठे? हा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने एसटी महामंडळाचे स्वच्छतागृह त्वरीत सुरू करावे, अशी मागणी कैलासबुवा काळे यांनी केली आहे.

Previous articleस्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता हरीश कानसकर याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल
Next articleनारायणगाव येथे शिवसेनेचे पेट्रोल डिझेल गँस दरवाढी विरोधात आंदोलन