आंबेठाण रोडवर गतिरोधक बसविण्याची मागणी

चाकण -आंबेठाण रस्त्यावर आंबेठाण चौक ते चाकण नगरपरिषद हद्दीपर्यंत मध्यभागी दुभाजक व शाळेजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी राम गोरे यांनी केली आहे

आंबेठाण रोड हा सिमेंट कॉक्रीटीकरण झाले असल्याने वाहनांचा वेग वाढलेला आहे. दररोज वाहनांचे अपघात त्याचे प्रमाण वाढले आहे तसेच यापुर्वी चार जणांना बळी गेला आहे.या रस्त्यावर समोरासमोर अपघात होत आहे. पादचारी नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. रस्ता दुभाजक साईड पट्टी व गतिरोधक बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे चाकण शहराध्यक्ष राम गोरे यांनी केली आहे.

Previous articleअखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे जिल्हा सहसचिवपदी दिनकर महाराज निंबळे यांची निवड
Next articleस्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता हरीश कानसकर याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल