मेहबूब काझी यांना स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कार प्रदान

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव येथील शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ शिक्षक मेहबूब काझी यांना नारायणगाव येथील जयहिंद नॅशनल क्लबच्या वतीने पहिला ‘शिवनेर भूषण स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कार’ नुकतच देण्यात आला. जयहिंद नॅशनल क्लबच्या २६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध कवी प्रदीप निफाडकर आणि युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला अशी माहिती जयहिंद नॅशनल क्लबचे अध्यक्ष अरविंद लंबे यांनी दिली.

याप्रसंगी माजी सभापती शिवाजीराव खैरे, जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर, माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री बोरकर, शरद बँकेच्या संचालिका पुष्पलता जाधव, जयहिंद पोलीटेक्निक कॉलेजचे सचिव विजय गुंजाळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरज वाजगे, विक्रम भोर, राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष दीपक वारूळे, जितेंद्र गुंजाळ, देवेंद्र कोराळे, बबन गुळवे, आशिष माळवदकर, संतोष वाजगे, डॉ.मिलिंद कसबे, मोबीन शेख, सादीक आतार, हरिश्चंद्र नरसुडे, शिवाजी घोलप, सुनील ढवळे, राहुल नवले, शेखर शेटे, अतुल आहेर, शोभना पोखरकर, दत्ता जाधव, किरण वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायणगाव व परिसरातील केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी तसेच सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरी साठी जयहिंद समूहाच्या वतीने दिला जाणाऱ्या ‘ शिवनेर भूषण स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्काराचे प्रथम मानकरी म्हणून मेहबूब काझी यांची निवड करण्यात आली.
तसेच सरपंच सेवा समितीच्या वतीने दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल योगेश बाबू पाटे, जिल्हा नियोजन समितीवर सदस्य पदी नियुक्त झालेले माऊली खंडागळे व विकास दरेकर, युवारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरज वाजगे, आदर्श ग्राम निर्मिती अभियान समिती सदस्य निवडीबद्दल विक्रम भोर यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध कवी व संपादक प्रदीप निफाडकर यांनी ‘ ‘यशस्वी जीवनाची आदर्श तत्व ‘ या विषयी व्याख्यान दिले.
याप्रसंगी आमित बेनके मेहबूब काझी, गुलाब नेहेरकर, डॉ.वर्षा गुंजाळ, विकास दरेकर, विक्रम भोर यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाचे नियोजन धर्मेंद्र गुंजाळ, अशोक चाळक, छगन पटेल, अमित अडसरे, श्रीकृष्ण ताम्हाणे, नितीन औटी व सर्व सदस्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद लंबे यांनी केले व सूत्रसंचालन सुनील मेहेर व ज्ञानेश्वर औटी यांनी केले. उपस्थितांचे आभार जितेंद्र गुंजाळ यांनी मानले.

Previous articleअवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारा कार्यकर्ताच निघाला दारू विक्रेता
Next articleकृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० अंतर्गत कृषी ग्राहकांसाठी वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्याच्या योजनेला चांगला प्रतिसाद