अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारा कार्यकर्ताच निघाला दारू विक्रेता

प्रमोद दांगट निरगुडसर

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वळती (ता.आंबेगाव) येथील हॉटेल सूर्यामध्ये अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्यावर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी दारू विक्री करणारा विजय अशोक मुळे व हॉटेल मालक हरीश महादू कानसकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वळती गावच्या हद्दीत हॉटेल सूर्या मध्ये ( दि १) रोजी रात्रीच्या वेळी अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मंचर पोलिसांना कळली असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता विजय अशोक मुळे ( रा.वळती ता.आंबेगाव पुणे,) हा त्याच्या ओळखीच्या लोकांना दारू विकत होता. त्याला याबाबत त्याला विचारले असता त्यांनी हॉटेल मालक हरीश महादू कानसकर ( रा. रांजनी, ता.आंबेगाव, जि. पुणे ) याच्या आर्थिक फायद्यासाठी मी हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्याजवळून पोलिसांनी ५,९००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून हॉटेल मालक हरीश कानसकर व विजय मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या बाबतची फिर्याद पो. ना. राजेंद्र हिले यांनी दिली असून पुढील तपास पोलीस नाईक मडके करत आहे.

सदर घटनेतील हॉटेल मालक हरीश कानसकर हा स्वतः समाजात मी एक सामाजिक कार्यकर्ता व विशेष पोलीस अधिकारी आहे असे सांगत वावरत असतो.या महाशयांनी पोलिसांकडे अवैध धंद्यांवर कारवाई करा अशी वारंवार मागणी केली होती. त्या संदर्भात अनेकदा त्याने पोलिसांवर जाहीर टीका देखील केली होती.मात्र आज त्याच्याच हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री करताना सापडली आहे.पोलिसांच्या या कामगिरी चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Previous articleमहाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर झाल्यास ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ – महेश तपासे
Next articleमेहबूब काझी यांना स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कार प्रदान