अवैध धंदे करणाऱ्यांवर मंचर पोलीसांची कारवाई

प्रमोद दांगट निरगुडसर

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पारगाव येथील हॉटेल रानवारा, हॉटेल केतन, होटेल हॉटेल सूर्यामध्ये अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून एकूण १२ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल व 1,577/- रु गुटखा जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि.१ रोजी पारगाव ( ता.आंबेगाव) च्या हद्दीत हॉटेल केतन येथे विकांत दत्तात्रय चांगण ( रा. पारगाव , ता.आंबेगाव ) हा त्याच्या ओळखीच्या लोकांना देशी दारू विकत होता. त्याच्याजवळून 936/- रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच हॉटेल रानवारा येथे नितीन महादू ढोबळे ( वय २६ रा. पारगाव ता. आंबेगाव पुणे ) यांच्याकडून ३,१९८/- रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. तसेच हॉटेल सूर्या येथे रवींद्र रामदास ढवळे ( वय २४, रा.पारगाव शिंगवे, ता.आंबेगाव पुणे ) विकास सुकून वाळुंज ( वय २४ रा.पोंदेवाडी ता.आंबेगाव पुणे ) भरत सुखदेव ढोबळे ( रा.पारगाव, ता.आंबेगाव पुणे) यांच्याकडून ८,१४०/- रुपयाची दारू व १,५७७ रुपयाचा गुटका जप्त करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पो. कॉ. विठ्ठल वाघ, पो.ना. नवनाथ नाईकडे, पो. कॉ. सुदर्शन माताडे यांनी दिली असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर खबाले, पो.ना.खैरे, पो.ना.नाईकडे करत आहे.

Previous articleलोणी येथे चोरी केलेल्या दोन चोरट्यांना अटक
Next articleमहाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर झाल्यास ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ – महेश तपासे