आई पासून ताटातूट झालेल्या बछड्याची उपासमारीमुळे मृत्यू

प्रमोद दांगट, निरगुडसर

पारगाव ( ता.आंबेगाव) हद्दीत आईपासून ताटातूट झालेल्या अडीच महिन्याच्या बिबट मादी बछड्याचा उपासमारीमुळे मृत्यू झाला असल्याची घटना सोमवार दि.१ रोजी घडली आहे.

याबाबत वनरक्षक सोपान अनासुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पारगाव ( शिंगवे ) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याजवळ वास्तव्यास असलेले ग्रामपंचायत सदस्य सचिन आस्वारे यांच्या घराजवळ उसाचे क्षेत्र आहे. सोमवार ( दि.१ ) रोजी सकाळी आस्वारे यांना कुत्री भुंकण्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर जाऊन पाहीले असता घराच्या भींतीच्या आडोशाला बिबट्या बछडा येऊन बसला होता आस्वारे यांनी कुत्र्यांना हुसाकाऊन लाऊन वनरक्षक सोपान अनासुने यांना बोलावुन त्यांच्याकडे बिबट्याचा बछडा सुपुर्द केला. अनासुने यांनी त्या बछड्याला वैद्यकीय तपासणीसाठी काठापुर बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखाण्यात घेऊन जात असताना रस्त्यात त्याचा दुर्देवी मृत्यु झाला.

पशुवैद्यकीय आधिकारी डॉ. नागेश पुरी यांनी मृत बछड्याचे शवविच्छेदन केले आहे.मृत बिबटया मादी जातीचा असून अंदाजे दोन महीने वयाचा आहे.आई पासुन ताटातुट झाल्यामुळे त्याच्या पोटात चार पाच दिवसापासुन काहीच अन्न गेले नसल्यामुळे उपासमारीमुळे त्याचा मृत्यु झाला असल्याचे डॉ. नागेश पुरी यांनी सांगीतले आहे.

Previous articleकार्यकर्त्याला दिलेला शब्द पूर्ण करणारे नेतृत्व आमदार निलेश लंके
Next articleजेष्ठ कीर्तनकार व शिवनेरभूषण भागवताचार्य ह.भ.प.सुमंत महाराज नलावडे यांचे निधन