कार्यकर्त्याला दिलेला शब्द पूर्ण करणारे नेतृत्व आमदार निलेश लंके

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

आमदार निलेश लंके आणि जनसामान्यांचा लोकनेता माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील म्हणजेच आपले आबा यांची आपल्या बोलण्यातून आणि आपल्या वागण्यातून प्रत्येक क्षणी आठवण करुन देणारे त्यांचे सुपुत्र युवानेते रोहित पाटील यांनी काल अजयशेठ हिंगे पाटील तसेच सुदर्शन जगदाळे यांच्या घरी सदिच्छा भेट घेऊन कार्यकर्ते यांना प्रोत्साहन दिले हे दोघेही सोशल मिडीयाचे कामकाज अतिशय प्रभावीपणे शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

आधीच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाला उशीर झाला परंतु कितीही वाजले तरी आज आम्ही तुम्हाला भेटायला येणारच. त्यामुळे अगदी बारा वाजून गेल्यानंतरही कार्यकर्त्याला दिलेला शब्द पूर्ण करणाऱ्या नेत्यांना भेटून खरंच खूप आनंद वाटला. अभिमान आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा अशी प्रतिक्रिया अजयशेठ हिंगेपाटील व सुदर्शन जगदाळे यांनी दिली.

Previous articleनारायणगाव येथे आत्महत्या प्रकरणी सात जणांना अटक
Next articleआई पासून ताटातूट झालेल्या बछड्याची उपासमारीमुळे मृत्यू