राष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत महाळुंगे येथे १५०० बालकांना डोस

चाकण- महाळुंगे (ता. खेड) येथील १५०० बालकांना लस देण्यात आल्याचे आरोग्यासेविका नंदा पारगे यांनी सांगितले. महाळुंगे आरोग्य उपकेंद्र, सद्गुरू नगर, बेंद वस्ती, जोपाईवाडी येथे लसीकरण करण्यात आले.

वाड्या-वस्त्यांवरील पालक सकाळपासूनच बालकांना लसीकरण करण्यासाठी घेऊन येत होते.पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन महाळुंगे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य मनोज इंगवले यांनी केले.

यावेळी आरोग्यसेविका सविता वाळके, आशा वर्कर उपस्थित होत्या.

पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन महाळुंगे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य मनोज इंगवले यांनी केले.

Previous articleशिरूर नगरपालिका घोडनदीचे नगरसेवक अभिजीत गणेश (तात्या) पाचर्णे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
Next articleनारायणगाव येथे आत्महत्या प्रकरणी सात जणांना अटक