माहिती सेवा समितीचे कार्य प्रशंसनीय- जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे

दिनेश पवार,दौंड

माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने राळेगणसिद्धी येथे माहिती अधिकार कायदा कार्यकर्ता कार्यशाळा,जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली,यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आण्णा म्हणाले की,
शुध्द आचार,शुध्द विचार,निष्कलंक जीवन,जीवनात थोडा त्याग व अपमान पचवण्याची सहनशीलता हि पंचसूत्री कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे.कार्यकर्त्यानी माझ्या सारखे संपूर्ण जीवन त्यागून काम करायची गरज नाही.आपले घर,प्रपंच सांभाळून दिवसातून एखादा तास,आठवड्यातून एखादा दिवस समाजासाठी,समाजातील गोरगरीब,वंचितांच्या प्रश्नांसाठी दिला पाहिजे.मक्याच्या एका दाण्याला पहिले स्वताला गाडून घ्यावे लागते.नंतरच त्या दाण्याचे भरदार कणीस तयार होते.
त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी स्वतःला गाडून घेऊन निस्वार्थी काम करत रहावे असे मार्गदर्शनपर अवाहन कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी जेष्ठ समाजसेवक,पद्मविभूषण आण्णा हजारे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
दुपारच्या दुसऱ्या सत्रात माहिती अधिकार कायदा प्रशिक्षक विठ्ठल बुलबुले यांनी कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कायदा,कायद्याची रचना व माहिती,विविध कलमे,अर्ज कसा करावा पासून अपिल कसे करावे याबाबत माहिती दिली.
प्रशांत देशमुख, राजेंद्र नाणकर व चंद्रकांत वारघडे यांनी सहभागी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून पुणे,मुंबई,सातारा, सोलापूर,नगर,नाशिक, उस्मानाबाद,लातूर,नांदेड अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून कार्यकर्ते या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.सहभागी कार्यकर्त्यांना प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
या महत्वपूर्ण कार्यशाळेच्या आयोजनासाठी माहिती सेवा समितीचे संस्थापक चंद्रकांत वारघडे,शिवाजीराव खेडेकर, बाळासाहेब चौधरी,पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे,सचिव प्रशांत महाराज भागवत, प्रशांत देशमुख, राजेंद्र नाणकर(नाशिक)संतोष काळे,सागर इंगळे,शरद ढेरंगे,कमलेश बहिरट,गणेश जाधव,प्रसाद जोशी,अंकुश कोतवाल,अँड.गणेश म्हस्के(पुणे)बालाजी लंगोटे(नांदेड)
यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रास्ताविक चंद्रकांत वारघडे यांनी तर,सुत्रसंचालन गणेश सातव यांनी केले व आभार लक्ष्मण गव्हाणे व प्रशांत भागवत यांनी मानले.

Previous articleशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चाकण येथे अभिवादन
Next articleमहात्मा गांधी यांची “खेड्याकडे चला” हि संकल्पना सर्वांनीच आत्मसात करून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी एकोप्याने प्रयत्न करायला हवेत – भास्करराव पेरे पाटील