शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चाकण येथे अभिवादन

Ad 1

चाकण – शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट, सरसेनापती, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना चाकण शहर पदाधिकार्‍यांच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहण्यात आली.शनिवार २३ जानेवारी २०२१ रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानात उत्साहाने साजरी केली जाते.खेड तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे यांचे नेतृत्वाखाली तालुक्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

आमदार स्व. सुरेशभाऊ गोरेंचे बंधू नितीन गुलाबराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, चाकण शहरातील उद्योजक, मा. ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली, शिवसेना चाकण शहरप्रमुख महेश शेवकरी यांच्या नेतृत्वाखाली चाकण शहरातील शिवसेना शाखेत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्याचप्रमाणे समस्त पदाधिकार्‍यांच्या वतीने प्रतिमेस अभिवादन करण्यात आले, तसेच चाकण येथील आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

यावेळी शिवसेना चाकण उपशहरप्रमुख स्वप्निल बिरदवडे, राजेंद्र खेडकर,अभिजीत जाधव, शेखर नाना पिंगळे, पांडुरंग गोरे, स्वामी कानपिळे, अनिल गंभीर, श्याम राक्षे, तसेच महिला आघाडीच्या सौ. कविताताई करपे, सौ. गितांजलीताई भस्मे, सौ. शारदाताई कोरगावकर, सौ. प्रभावती साळुंखे उपस्थित होते.