छत्रपतींच्या एका निस्सीम भक्ताच्या “मुकद्दर” या पुस्तकाला सबंध महाराष्ट्रात पोहचवून अभिवादन करूया

उरुळी कांचन –

छत्रपतींच्या एका निस्सीम भक्ताच्या – आपल्या सर्वांच्या लाडक्या “स्वप्नील कोलते पाटील – उनाड” च्या अंत्यविधी प्रसंगी त्याच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी उठलेले ते जयघोष अजूनही आपल्या साऱ्यांच्या कानात घुमत आहेत.

काल सकाळी वाजलेले फोन, साऱ्या महाराष्ट्रातील शिवशंभू पाईकांच्या काळजाला घरं पाडणारे ठरले. पण विधिलिखित कुणी टाळू शकत नाही. जे घडायला नको होते ते घडून गेलंय, पण आता खऱ्या अर्थानं आपल्या अंतरी असणाऱ्या या उनाड मित्राच्या खांद्याला खांदा भिडवून उभं राहण्याची वेळ आहे.

आपल्या सर्वांचे लाडके कोलते पाटील यांची कलाकृती असणाऱ्या मुकद्दर या पुस्तकाला सबंध महाराष्ट्रात आपल्याला पोहचवायचे आहे, या पुस्तकाची प्रिंटिंगची किंमत सोडता खाली दिलेल्या नंबरहुन होणारी विक्री रक्कम ही सर्वस्वी उनाड यांच्या मुलांच्या नावे आपण जमा करणार आहोत.

पैशाच्या स्वरूपात रक्कम जमा करून, आपण कोलते पाटील परिवाराला सदैव आपल्या ऋणात ठेवण्यापेक्षा कोलते पाटील लिखित हे साहित्य सबंध महाराष्ट्रभर पसरवून आपण त्यातून उनाडच्या कष्टाची कमाई त्यांच्या घरच्यांना सुपूर्द करुयात.

जो मित्र परिवार पुस्तक वाचत नाही त्यांनी भेट देण्यासाठी असो वा इतर कुठल्याही प्रकारातून मुकद्दर सर्वत्र पोहचवून, कधीच विसरता येणार नाही अश्या आपल्या मित्राला अभिवादन करूयात नियतीशी झालेले करार कधी बदलता येत नसले तरी मुकद्दर बदलण्याची ताकद मराठे आपल्या मनगटात बाळगतात हा आपला इतिहास आहे, आणि तो या निमित्ताने आपण सिध्द करुयात. आजपासून मित्र परिवाराला भेट देण्यासाठी असो वा इतर काही कार्यासाठी आपण मुकद्दर पुस्तकांच्या प्रती आवर्जून खरेदी कराव्यात.

संपर्क –
दिनेश व. आखाडे – ९९६०६२७२६२
प्रसन्न भोर – ९८६०९४७६१५
ओंकार कांचन – ७२७६६४३८२९
ओंकार माने – ८८५६८८८८०१

Previous articleमाहिती सेवा समितीच्या माध्यमातून राळेगणसिद्धी येथे पार पडली माहिती अधिकार कायदा कार्यकर्ता कार्यशाळा
Next articleशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चाकण येथे अभिवादन