श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण धनसंकलन अभियानास घोडेगावमध्ये सुरूवात

 सिताराम काळे घोडेगाव

 श्री हरिश्चंद्र महादेव मंदिरात आरती घेवून तसेच समर्पण निधी पुस्तिकेचे पुजन झाल्यावर श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण धनसंकलन अभियानास घोडेगाव (ता. आंबेगाव) मध्ये सुरुवात झाली.

घोडेगाव शहरात धनसंकलन अभियानात मोठया प्रमाणात नागरिकांचा सहभाग होता. प्रभात फेरी दरम्यान मार्गात रांगोळया काढून तसेच फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. या प्रभात फेरीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल-दुर्गा वाहिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी सहभाग घेतला. घोडेगाव शहरातील प्रत्येक घरापर्यंत पोहचून अभियान पुर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला. हे धनसंकलन ऐच्छिक असून दहा, शंभर रूपयाची कुपन्स आहे.

Previous articleनारीशक्ती च्या एकजुटीतून देश प्रगतीपथावर येईल – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
Next articleसभागृह नेते प्रकाश धारीवाल कार्यकर्त्यांना ताकद देणारे तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे- नगरसेवक अभिजीत पाचर्णे