नारीशक्ती च्या एकजुटीतून देश प्रगतीपथावर येईल – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

नारायणगाव (किरण वाजगे)

राष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जडणघडणीमध्ये नारीशक्ती ने सामूहिकरीत्या एकत्र आले पाहिजे. असे झाले तर देश प्रगतीपथावर जाईल असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले. बुधवार दि २७ जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे सभागृहात
आपला आवाज न्यूज चॅनलचा ५ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कृष्णप्रकाश बोलत होते.

यावेळी विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या महिलांचा नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच २०२१ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा शहराच्या प्रथम नागरीक महापौर माई ढोरे, खासदार श्रीरंग अप्पा बारणे,आयर्न मॅन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, आमदार महेशदादा लांडगे, सिने अभिनेत्री तुझ्यात जिव रंगला मालिका फेम अक्षया देवधर, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर केशव घोळवे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, क्रीडा सभापती उत्तम केंदळे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी महापौर अपर्णा डोके, जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेविका सुमनताई पवळे, नगरसेवक शैलेश मोरे, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.शैलेश मोहिते,जुन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दिपेशसिंह परदेशी, ज्येष्ठ वास्तुतज्ञ मुकुंदराव ढिले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या अध्यक्षा पुजा बुट्टे पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव विश्वासराव आरोटे, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश कवडे, ज्येष्ठ पत्रकार डी. के.वळसे पाटील, दत्ता म्हसकर, रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष विलास कडलक, जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे ,
आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुलसिंह परदेशी, आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे, सुनिती ज्वेलर्स चे संचालक लखीचंद कटारिया, साईबा अमृततुल्य चे संचालक अमोल ईचगे, सोन सखी चे संचालक रविंद्र सोनानी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.

कार्यक्रमा दरम्यान स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, कामगार नेते यशवंत भोसले, अँड सुशील मंचरकर , शिवकुमार बायस, दिनेश राजपूत, पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादी युवती वर्षा जगताप, लायन सुनील जाधव, राजकुमार राऊत, शहरातील प्रिंट, न्यूज , पोर्टल चे पत्रकार, उद्योजक संजय जगताप , माजी नगरसेवक दत्ता पवळे आदींनी शुभेच्छा दिल्या.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.


यावेळी समाजात काम करणाऱ्या नारीशक्तीना मराठमोळा फेटा बांधून, शाल, मानचिन्ह, व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांचा सत्कार मुख्य संपादक अतुलसिह परदेशी, आपला आवाज आपली सखीच्या संगीता तरडे, विभागीय संपादक रोहित खर्गे, कार्यकारी संपादक किरण वाजगे, निवासी संपादक पवन गाडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त आयर्न मॅन कृष्ण प्रकाश यांनी आपल्या विशिष्ट शैलीत आपला आवाज च्या वर्धापणदिनास शुभेच्या देताना या चॅनल चे काम अतिशय उत्कृष्टपणे सुरू असून असेच काम सुरू ठेवावे असे सांगितले. त्याचबरोबर नारीशक्ती चा हा स्तुत्य उपक्रम आपण करत आहात हे खूप चांगले काम आहे व नारीशक्ती विषयी आपल्या हिंदी व मराठीतून केलेल्या भाषणातून उपस्थितांना प्रभावित केले.

जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनीही आपल्या विशेष शैलीत फटकेबाजी करत पत्रकारांचा कार्यक्रम म्हणजे आम्हा राजकीयांना उपस्थित रहावेच लागते नाहीतर काय लिहितील व दाखवतील हे सांगता येत नाही अशी मिश्कील टिप्पणी करत गमतीचा भाग सोडा पण असे कार्यक्रम नेहमी घ्या असे सांगितले आम्ही आहोत तोपर्यंत तुमच्या कार्यक्रमाला हजर राहू असे आवर्जून सांगितले.
आमदार महेश लांडगे यांनी या चॅनल चे काम समाजातील तळागाळातील जनतेसाठी तसेच प्रत्येक क्षेत्राशी निगडित काम सुरू असून असेच काम सुरू ठेवावे असे सांगितले.
यावेळी मागीलवर्षीच्या नारीशक्ती ना त्यांच्या कार्याची नारीशक्ती पुस्तिकीचे अनावरण व वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सिने अभिनेत्री अक्षया देवधर होत्या त्यांच्याबरोबर उपस्थितांना सेल्फी व फोटो घेण्याचा मोह चाहत्यांना आवरता आला नाही. पण खऱ्या अर्थाने मुख्य आकर्षण ठरले ते आयर्न मॅन कृष्ण प्रकाश हेच. कारण कार्यक्रम संपल्यानंतर देखील किमान अर्धा ते पाऊण तास अनेक महिलांनी त्यांना गराडा घातला अन सेल्फी व फोटोसाठी झुंबड उडाली. त्यांनीही प्रत्येकाला हसतमुख सेल्फी व फोटो घेऊ दिले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य संपादक अतुलसिह परदेशी यांनी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचे
स्वागत केले व भविष्यात आपण एफ.एम. चॅनल ची निर्मिती करणार असल्याचे जाहीर केले. संगीता तरडे यांनी आपल्या मनोगनात मागील वर्षी मी पुरस्करार्थी होते तर यावर्षी आम्ही पुरस्कार देत आहोत असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले तर आभार पुणे विभागीय संपादक रोहित खर्गे यांनी मानले.

Previous articleमंचर येथील प्रांत कार्यालय घोडेगाव येथे आणण्याची मागणी
Next articleश्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण धनसंकलन अभियानास घोडेगावमध्ये सुरूवात