कर्तव्याबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणे गरजेचे-पोलीस निरीक्षक नारायण पवार

दिनेश पवार,दौंड

कर्तव्याबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य केल्यास या लोकशाही प्रधान देशात सर्वसामान्य जनतेला फार मोठी मदत होईल असे प्रतिपादन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अविश्री बालसदन दौंड येथे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी व्यक्त केले.

अविश्री बालसदन 1996 पासून अनाथ मुलांसाठी सुरू आहे, ज्यांनी आईवडील नाही अशा अनाथ मुलांचा सांभाळ अविश्री बालसदन मध्ये केला जातो,सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या हातांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत होत राहते,आपले वाढदिवस इथे या मुलांच्याबरोबर करतात,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी देखील आपला वाढदिवस या मुलांबरोबर साजरा केला आहे,

ज्यांना कोणी नाही, जे गरजवंत आहेत अशांसाठी आपण थोडी फार मदत करावी असेही पवार यांनी सांगितले, कोरोना च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेवून हा कार्यक्रम थोडक्यात घेण्यात आला यावेळी डॉ. बचुटे, पोलीस नाईक आण्णासाहेब देशमुख,सस्ते साहेब,गणेश फुटाणे,रवी देसाई,एस.पी.शितोळे,आदी मान्यवर उपस्थित होते, अविश्री बालसदन चे प्रमुख अनिल कटारिया यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले तर प्रा.दिनेश पवार यांनी सूत्रसंचालन केले

Previous articleसंगणक परीचालकांचे विविध मागण्यांसाठी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांना निवेदन
Next articleचासकमान धरण परिसरात राज्यमार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा बछडा ठार