संगणक परीचालकांचे विविध मागण्यांसाठी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांना निवेदन

दिनेश पवार,दौंड

संग्राम व आपले सरकार या उपक्रमाच्या माध्यमातून गेली दहा वर्षांपासून राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कार्यालयात संगणक परिचालक काम करत आहेत, राज्यातील सर्व जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना या परीचालकांच्या माध्यमातून पोहचवण्यासाठी मदत होते, डिजिटल महाराष्ट्र करण्यासाठी यांचे योगदान महत्वपूर्ण आहे, मात्र शासनाने यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे संगणक परिचालक यांच्यामार्फत राज्यभर निवेदन सादर करून मागण्या मान्य करण्याची विनंती केली जात आहे, दौंड तालुक्यातील सर्व संगणक परिचालक यांनी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांना निवेदन दिले आहे.

गेली दहा वर्षांपासून संगणक परिचालकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला माहिती पोहचवण्यासाठी तसेच वेगवेगळ्या माध्यमातून मदत होत आहे,तरी सर्व संगणक परीचालकांची नियुक्ती महाराष्ट्र आयटी महामंडळ कडून करण्यात यावी व किमान वेतन दरमहा देण्यात यावे या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यासाठी निवेदन दिले आहे.

यावेळी दौंड तालुका अध्यक्ष अमोल म्हेत्रे,तुषार जगताप, सतीश थोरात, स्वाती आटोळे,सोनाली धिवार, तृप्ती टेळेकर यांच्यासह दौंड तालुक्यातील सर्व संगणक परिचालक उपस्थित होते

Previous articleअन् एकवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र
Next articleकर्तव्याबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणे गरजेचे-पोलीस निरीक्षक नारायण पवार