पुणे जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण २९ जानेवारीला

पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच झाल्या आहेत. मात्र या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते.

आता जिल्हा प्रशासनाने सरपंच पदाचे आरक्षणाची तारिख जाहीर केली आहे, त्यानुसार येत्या शुक्रवारी दि.२९ जानेवारी रोजी तालुक्याच्या ठिकाणी ही सोडत होणार आहे.

त्यासाठी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येणार हे उघड होणार आहे, ग्रामपंचायत सोडतीकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous articleरामदास पवळे यांचा”माणुसकीचा दुत” पुरस्काराने गौरव
Next articleआंबेगाव तालुक्यात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कातकरी आदिवासी बांधवांचे बेमुदत उपोषण