रामदास पवळे यांचा”माणुसकीचा दुत” पुरस्काराने गौरव

मुळशी (प्रतिनिधी) : तुळजाभवानी सेवाभावी ट्रस्टचे संस्थापक रामदास पवळे यांना लोकमान्य सोसायटीच्या “माणुसकीचा दुत” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हभप ऋषीकेश महाराज चोरघे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी लोकमान्य सोसायटी पिरंगुट शाखाधिकारी तुषार पवार, पिरंगुटचे मा. उपसरपंच वैभव पवळे, तुळजाभवानी ट्रस्टचे अध्यक्ष सचिन पवळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवळे, उद्योजक विजय पवळे शांताराम मते व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे मुळशी तालुक्यातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

हा पुरस्कार प्रदान समारंभ शिवकालीन तुळजाभवानी मंदिर सभागृहात संपन्न झाला. राहुल पवळे यांनी सुत्रसंचालन केले.

Previous articleचाकण येथील महापारेषण कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
Next articleपुणे जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण २९ जानेवारीला