पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ५२०.७८ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

अमोल भोसले,पुणे

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२१ – २२ करिता मंजूर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ५२० कोटी ७८ लाख रुपये, अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत १२८ कोटी ९३ लाख रुपये व आदिवासी उपयोजना अंतर्गत ४४ कोटी ३८ लक्ष रुपयाच्या कमाल आर्थिक मर्यादेत प्रारूप आराखड्यांना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२१ – २२ साठी मंजूर नियतव्यय आणि झालेला खर्च तसेच २०२१ – २२ साठी प्रस्तावित करण्यात येणाऱ्या नियतव्ययासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन सभागृहात झाली.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार गिरीष बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलिप मोहिते पाटील, आमदार अशोक पवार, आमदार संजय जगताप, आमदार सुनिल टिंगरे, यांच्यासह सर्व आमदार तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous articleराळेगणसिद्धी येथे माहिती सेवा समितीच्या वतीने एक दिवसीय माहिती अधिकार कायदा कार्यशाळेचे आयोजन
Next articleचाकण येथील महापारेषण कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा