उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दिपक हरण यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव

Ad 1

सिताराम काळे घोडेगाव

– आंबेगाव तालुक्यातील उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दिपक हरण यांची निवड करण्यात आली आहे. २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवसच्या अनुषंगाने त्यांना जिल्हाधिकारी राजेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली आहे. त्यामुळे २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने आंबेगाव विधानसभा मतदार संघांतर्गत सन २०२० निवडणूक, मतदार जनजागरूकता व छायाचित्र मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून दिपक यशवंतराव हरण यांना गौरविण्यात आले.