घोडनदीत अवैध्यरित्या वाळुचा उपसा करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

सिताराम काळे घोडेगाव

– कानसे (ता. आंबेगाव) जवळील घोडनदीचे पात्रात अवैध्यरित्या वाळुचे उत्खणन करणा-यांवर घोडेगाव पोलीसांनी पर्यावरण संरक्षण व सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदयानुसार तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिली.

कानसे माळवाडी गावचे हद्दीतील घोडनदीचे कोरडे पात्रात दि. २२ रोजी दुपारी १.३० चे दरम्यान पोलीसांना एक निळा व पांढरा रंग असलेली दुचाकी ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये जाळी लावून वाळु चाळत असल्याचे दिसुन आले. त्यावेळी पोलीस आल्याची चाहुल लागताच वैभव बबन कडुसकर (वय- ४२) रा. साकोरे यास अटक केली असुन त्यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. तर पळुन गेलेल्या दोन अज्ञात साथीदार पोलीस तपास करत आहे.

घोडनदीपात्रात असलेली ट्रॅक्टरची ट्रॉली, वाळू असे एकंदरीत ५४ हजार रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई जालींदर रहाणे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचे मार्गदर्षनाखाली देवराम धादवड, अविनाश कालेकर करत आहे.

Previous articleपोलीस असल्याचा बहाणा करत निवृत्त कृषी अधिकाऱ्याची दोन तोळ्याची चैन व साडेसात ग्रॅमची अंगठी चोरट्यांने पळवली
Next articleकिसान सभेचे आंदोलन स्थगित