स्वच्छ तसेच पिण्यायोग्य पाणी पुरवठा करावा मनसे ची मागणी

आळंदी शहरातील पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन मागील आठवड्यात इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यावर फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा गेली सहा दिवसापासून पूर्णपणे बंद झाल्याने शहरातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले,असाच प्रकार मागील वर्षी देखील झाला होता.मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे शहरातील संपूर्ण पाणी पुरवठा ठप्प तर होतोच,खरंतर पाण्यासारख्या अत्यंत महत्वाच्या गोष्टीसाठी तत्पर दुसरी पर्यायी व्यवस्था आळंदी नगरपालिकेमार्फत उपलब्ध नाही ही मोठी दुर्देवाची बाब आहे असो यापुढे भविष्यात आशा प्रकारामुळे पाणी पुरवठा खंडित होऊ नये यासाठी लगेच पर्यायी व्यवस्थेसाठी नियोजन करून कायमस्वरूपी भविष्यात अशा अडचणीमुळे आळंदीकराना त्रास होणार नाही याची काळजी म्हणून दुसऱ्या नवीन पाईपलाईनसाठी काम त्वरित करावे.

तसेच बुधवार दिं १३ जानेवारी २०२१ पासून आळंदी शहरामध्ये पाणी पुरवठा करण्यात आला परंतु नळाला आलेले पाणी हे दुर्गंधीयुक्त,फेसयुक्त,गढूळ, व पिण्यासाठी योग्य नव्हते यापासून नागरिकांच्या आरोग्यास धोका पोचू शकतो.आपण करत असलेला पाणी पुरवठा हा पिण्यायोग्य नाही म्हणून लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून पाणी पुरवठा स्वच्छ व पिण्यायुक्त करावा तसेच इंद्रायणी नदीवरील जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी खर्च होतो परंतु जलपर्णी काही पूर्णपणे निघत नाही आता असलेली जलपर्णी लवकरात लवकर काढून घेण्यात यावी,या मागणीचे निवेदन मा.मुख्याधिकारी अंकुश जाधव साहेब, नगराध्यक्षा सौ.वैजंयताताई उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागरशेठ बोरुंदिया,पाणी पुरवठाप्रमुख अक्षयकुमार श्रीगिरी यांना देण्यात आले.

यावेळी मनसेचे मा.शहराध्यक्ष निलेश घुंडरे पाटील, रस्ते आस्थापनाचे तालुका अध्यक्ष प्रसाद बोराटे शहराध्यक्ष तुषार(बाळु)नेटके उपस्थित होते.

Previous articleकोरोनाचे संकट अद्याप संपले नसल्याने शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
Next articleकमान ग्रामपंचायतवर श्री भैरवनाथ महाराज जनसेवा विकास पॅनलचे वर्चस्व