आंबेगाव पंचायत समिती आवारातील क्रांतीस्तंभावर क्रांतिकारकाच्या नावाचा समावेश करण्याची मागणी.

सिताराम काळे घोडेगाव

आंबेगाव पंचायत समिती आवारात नविन चालू असलेल्या क्रांतिस्तंभावर क्रांतिकारकांच्या नावांमध्ये आदिवासी आदयक्रांतिकारक लायन हार्टेड होण्या भागू केंगले यांच्या नावाचा समावेश अशी मागणी बिरसा ब्रिगेड आंबेगाव व आदिवासी क्रांती संघटना यांनी लेखी निवेदनाव्दारे सभापती संजय गवारी यांच्याकडे केली आहे.

आदिवासी आदयक्रांतिकारक लायन हार्टेड होण्या भागू केंगले यांचा नावाचा समावेश करावा यासाठी सन २०१६ पासुन मागणी केली जात आहे. परंतु यावर अजुन कोणतीच कारवाई झाली नसल्याने दि. २५ जानेवारीला बिरसा ब्रिगेड व आदिवासी क्रांती संघटना यांनी आंबेगाव पंचायत समिती समिती समोर उपोषणास बसेल असा इशारा दिला होता.

त्याअनुषंगाने सभापती संजय गवारी यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी जोपर्यंत होण्या केंगले यांच्या क्रांतीस्तंभावरील नावाबाबत जोपर्यंत जिल्हाधिकारी निर्णय देत नाहीत, तोपर्यंत नवीन क्रांतिस्तंभाचे उद्घाटन केले जाणार नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर २५ जानेवारीचे उपोषण मागे घेत असल्याची माहिती अध्यक्ष आदिनाथ हिले यांनी दिली. यावेळी प्रविण पारधी, विकास पोटे, मारूती केंगले, संतोष तिटकारे आदि बिरसा ब्रिगेडचे शिलेदार उपस्थित होते.

Previous articleबिबट्यांच्या बंदोबस्त करण्याची आमदार राहुल कुल यांची मागणी
Next articleचोरलेली स्विप्ट कार अवघ्या ७ तासात आरोपीसह ताब्यात पुणे ग्रामिण LCB पथकाला यश