झालं इलेक्शन…. जपा रिलेशन..

दिनेश पवार,दौंड

नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका संपन्न झाल्या,काहींचा दणदणीत विजय तर काहींचा दारुण पराभव झाला तर कोणी काटावर निवडून आले तर कोणी थोडक्यात अपयशी ठरले, काहींनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली यात काही यशस्वी ठरले तर काही अपयशी सत्तेचा सारीपाट हा गेली एक महिन्यापासून आपण अनुभवला,निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवणे,आलेल्या सणाचा ही उपयोग करून घेणे,प्रचार प्रभावी कसा होईल यासाठी वाटेल ते करणे यामुळे नकळत आपलेच आपल्या विरोधात गेले,कोण हा वार्डात तर कोण विरोधी वार्डात घरातली,रक्ताची नाती प्रतिस्पर्धी बनली,एकमेकांचे उणेंदुणे काढून आपण याच्यापेक्षा कसा प्रभावी उमेदवार आहे हे पटवून देण्यात उमेदवारांनी दिवसाची रात्र केली, ढाबे, पार्ट्या रंगल्या,(यावेळी कोरोना मात्र नावालाच उरला होता) विकासकामांचे जाहिरनामे,विकासाची वचनपूर्ती, वेगवेगळ्या चालीवरती बसवलेली गाणी,गावागावात वाजू लागली, उमेदवार हितचिंतकानी दारोदारी जावून प्रचार केला नि याचे फल विजय पराजय या रुपात निकालाच्या दिवशी दिसून आले,यात विजयी झालेल्या उमेदवारांनी पराभूत झालेल्या उमेदवारांची खेचाखेची न करता जनतेने दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नशील असावे तर पराजित झालेल्या उमेदवारांनी आत्मसमर्पण करून जिथे कमी पडलो त्याची दुरुस्ती करून पुढील संधीसाठी तयारी करावी.

गुलाल कुणाचाही असो सर्व माणसं आपल्याच गावातील आहेत,आपलीच आहेत,कोणताही विजय किंवा पराजय हा अंतिम नसतो,शांत रहा संयमी रहा,मागील 15 दिवसात ज्या लोकांना हात जोडत होता त्यांना त्रास होईल असे न वागता,गावच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण पिढीच्या भवितव्यासाठी राग,विरोध,द्वेष विसरून एक होणे गरजेचे आहे, आपल्या कर्तृत्वाने प्रभुत्व निर्माण होईल नि नेतृत्वाची धुरा नक्कीच तुमच्या हातात येईल म्हणूनच झालं इलेक्शन आता जपा रिलेशन हे ध्यानात ठेवून सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

Previous articleपुर्ण चौकशीनंतर आगीचं कारण समोर येईल-आजित पवार
Next articleबिबट्यांच्या बंदोबस्त करण्याची आमदार राहुल कुल यांची मागणी