“संग्राम घोडेकर” हल्ला प्रकरणी मुख्य सूत्रधार चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्या जामीन अर्जावर २५ जानेवारीला सुनावणी

नारायणगाव (किरण वाजगे

नारायणगाव येथील जमीन खरेदी विक्री एजंट संग्राम घोडेकर प्राणघातक हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला मुख्यसूत्रधार माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्या जामीन अर्जावर आज देखील सुनावणी न झाल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या जामीन अर्जावर आता दि.२५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या कटातील प्रमुख आरोपी गणी उर्फ गणेश रामचंद्र नाणेकर, खबऱ्या संदीप पवार आणि अजय उर्फ सोन्या राठोड या तिघांना काल. दि.२० रोजी जुन्नर न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. असल्याची अधिकृत माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी अल्पवयीन असल्याने यापूर्वीच त्यांना १२ जानेवारी रोजी बालसुधार गृहात रवाना केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार दि.७ जानेवारी २०२१ रोजी कोल्हेमळा येथील चौकात जमीन खरेदी विक्री एजंट संग्राम घोडेकर याचेवर दुपारी १२ च्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला त्यात घोडेकर गंभीर जखमी झाले. शुक्रवारी दिनांक ८ जानेवारी रोजी या कटातील मुख्यसूत्रधार माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर कोऱ्हाळे यास नारायणगाव पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने पोलीसांच्या तपासातील प्रगती पाहून, आरोपी कोऱ्हाळे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

सोमवार दि.११ रोजी नारायणगाव पोलीसांनी या कटातील मुख्य आरोपी गणेश रामचंद्र नाणेकर (वय २८,रा.चाकण,ता.खेड),कटातील खबऱ्या संदीप बाळशिराम पवार ( वय २०’रा.पिंपळवंडी, ता.जुन्नर) आणि अजय उर्फ सोन्या राठोड (वय २४,रा.चौदा नंबर,ता.जुन्नर),या तिघांसह दोन अल्पवयीन अशा पाच आरोपींना चाकण येथून ताब्यात घेतले. शुक्रवार दि.१५ जानेवारी रोजी
कटातील मुख्यसूत्रधार चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे याने अंतरिम जामीन मिळविण्यासाठी उपजिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने तब्बेतीचे कारण देत न्यायालयात सोमवार दि.१८ रोजी मूळ जामीनासाठी अर्ज दाखल केला. या मूळ जामीन अर्जावरील सुनावणी दि.२१ रोजी होणार होती. मात्र न्यायालयाच्या अतिरिक्त कामकाजामुळे सुनावणी होऊ शकली नाही. आता न्यायालयाने पुढील सुनावणी दि.२५ जानेवारी रोजी होणार असल्याचे सांगितले.

प्राणघातक हल्ल्यात नारायणगाव पोलीसांनी केलेला तपास पाहता सोमवार दि.२५ रोजी मुख्यसूत्रधार कोऱ्हाळे यांना मूळ जामीन मिळतो की काय? हे पाहावे लागेल. सध्यातरी तपासकार्यात नारायणगाव पोलिसांनी केलेली प्रगती समाधानकारक आहे. पोलीसांनी गुन्ह्यातील सहभागी आरोपींना तीन दिवसांत केलेली अटक आणि गुन्ह्यातील वस्तू,रक्ताने माखलेले कपडे,गाडी आणि कोयता या जप्त केलेल्या वस्तू या वरून तपासात कोणत्याही त्रुटी ठेवल्या नसल्याचे समजते. यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड व त्यांच्या सहकाऱ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

Previous articleग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी पाच वर्ष घर सोडून बाहेर राहिला पठ्ठ्या
Next articleपुर्ण चौकशीनंतर आगीचं कारण समोर येईल-आजित पवार