दावडी ग्रामपंचायतवर श्री महालक्ष्मी ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

राजगुरूनगर- दावडी मध्ये श्री महालक्ष्मी ग्रामविकास परिवर्तन पॅनल ने सत्ताधारी पॅनलचा दणदणीत पराभव करत निर्विवाद यश मिळवले आहे.श्री महालक्ष्मी ग्रामविकास परिवर्तन पॅनल प्रमुख संतोष सातपुते यांनी सत्ताधारी पॅनल प्रमुखांचा पराभव करत आठ जागांवर विजय मिळवत सत्ताधारी पॅनल ला सुरूंग लावत निर्वाद सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.

श्री महालक्ष्मी ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे राहुलदादा बाळासाहेब कदम (मा.तंटामुक्ती अध्यक्ष),राणीताई सुरेश डुंबरे, माधुरीताई हिरामण खेसे, पुष्पाताई रमेश होरे, अनिल तुकाराम नेटके,संभाजी (आबा) रामराव घारे, संतोष केरभाऊ सातपुते, धनश्रीताई रवींद्र कान्हुरकर हे उमेदवार विजयी झाले आहेत.

राहुल दादा जाधव ,सचिनशेठ नवले,भाऊसाहेब होरे,मारुती आप्पा बोत्रे, सुरेशआप्पा डुंबरे,राजाराम कान्हूरकर,गोरक्ष दिघे,किसनशेठ दिघे,राहुल सातपुते,देवराम सातपुते,तुकाराम गाडगे पाटील,संदीप गाडगे, संजय नेटके, भिवाजी गाडगे, युवराज सातपुते, संभाजी गाडगे,शरद सातपुते,भरत कान्हुरकर यांच्या सह गावातील ग्रामस्थ व तरूणांचे या विजयात मोलाचे योगदान लाभले.

Previous articleभोसे ग्रामपंचायतीवर श्री सद्गगुरू कृपा ग्रामविकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व
Next articleबैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी नॅशनल अँनिमल वेलफेअर बोर्डाची बैठक बोलावण्याची केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी