भोसे ग्रामपंचायतीवर श्री सद्गगुरू कृपा ग्रामविकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

चाकण-खेड तालुक्याचे लक्ष लागलेल्या भोसे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यावर्षी तिरंगी लढत पाहायला मिळाली. यामध्ये श्री सद्गगुरू कृपा ग्रामविकास पॅनेलने घवघवीत यश संपादन करून लढलेल्या १० जागांवर विजय संपादन केला.

भोसे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकंदरीतच दावे , प्रतिदावे केले जात असल्याने निवडणुकीत शेवटपर्यंत चढाओढ सुरु होती. परंतू नेतृत्व कसे असावे तर ते विश्वासाचं, आपुलकीचं आणि जनसामान्यांच या ब्रीदवाक्या प्रमाणेच मतदार राजाने कौल देत श्री सद्गगुरू कृपा ग्रामविकास पॅनेलच्या हाती एकहाती सत्ता दिली.

भोसे गावचे एक विश्वासू नेतृत्व , जनसामान्यांचा आधार असणारे दिगंबर चंद्रकांत लोणारी यांनी मागील पंचवार्षिक काळात ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंचपदी असताना समाज हितासाठी अनेक लोक कल्याणकारी उपक्रम राबवून ठोस व भरीव अशी कामे केली. केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारराजाने त्यांच्या वरील विश्वास सार्थ ठरवत भोसे ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या एकहाती दिल्या .

भोसे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीमध्ये श्री सद्गगुरू कृपा ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांनी भरघोस मताधिक्य घेत विजयश्री प्राप्त केली.प्रभाग क्रमांक १ मधून रोहिणी पोपट पिंगळे(ओबीसी महिला) – ३५६ मते , रंजना संजय पठारे ( सर्वसाधारण महिला) – ३६४ मते , विश्वास पंडीत गांडेकर ( सर्वसाधारण पुरुष ) – ३७२ मते , प्रभाग क्रमांक २ मधून दिगंबर चंद्रकांत लोणारी ( ओबीसी पुरुष ) – ३०९ मते , लंकाबाई शांताराम कुटे ( सर्वसाधारण महिला ) – ३२० मते , चंद्रकांत सयाजी गांडेकर ( सर्वसाधारण पुरुष ) – २५३ मते , प्रभाग क्रमांक ३ मधून प्रतीत विठ्ठल ओव्हाळ ( अनुसुचित जाती ) – ३१० मते , पुजा प्रसाद गुंडगळ ( सर्वसाधारण महिला ) – ३४५ मते प्रभाग क्रमांक ४ मधून विजय अशोक काळे ( अनुसुचित जाती जमाती ) – ४९३ मते , मिनाक्षी दिगंबर लोणारी ( सर्वसाधारण महिला ) – ३७० मते, शितल ज्ञानेश्वर कुटे ( ओबीसी महिला ) बिनविरोध विजयी झाले.
विजयी पॅनेलचे नेतृत्व नितीनभाऊ लोणारी,दिंगबर लोणारी, ज्ञानेश्वर मुंगसे,मुचकुंद जाधव,गणेश दळवी, हनुमंत कुटे, सयाजी गांडेकर, आण्णा लोणारी गणेश कुटे जालिंदर कुटे,नाना गांडेकर,संजय पठारे, हरिदास गायकवाड, नितीन लोणारी (आर्मी) यांनी केले होते.

Previous articleसंतोष कांचन यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड
Next articleदावडी ग्रामपंचायतवर श्री महालक्ष्मी ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे वर्चस्व