संतोष कांचन यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री – पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार, शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे ,शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार.

पक्षाने जी जबाबदारी दिली ती यशस्वीपणे पार पाडणार तसेच पक्षवाढीसाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल.असे नुतन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन यांनी सांगितले.