शेवाळवाडी गावात शिवसेनेला भगवा फडकविण्यात यश

सिताराम काळे, घोडेगाव

जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई थोरात व शरद बँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता शेठ थोरात यांच्या शेवाळवाडी गावात शिवसेनेला भगवा फडकविण्यात यश आले आहे.

शेवाळवाडी गावात ग्रामपंचायत सदस्य ची संख्या 9 असून येथे झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अशोक थोरात व योगेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली उभ्या केलेल्या पॅनेलने सहा जागा जिंकून शेवाळवाडी ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे.
वार्ड क्रमांक एक मध्ये थोरात नवनाथ निवृत्ती,शेटे माधुरी विजय, थोरात सारिका खंडू, वार्ड क्रमांक दोन मध्ये डेरे मनोज जयराम, थोरात अश्विनी अमोल,थोरात प्रतिमा संजीव, ब ढे सुहास भगवान, थोरात निलेश विलास, चिखले मेघा विक्रम. अशी निवडून आलेल्या उमेदवारांची नावे आहेत, यापैकी ढेरे मनोज जयराम हे मंचर गावचे माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांचे निकटवर्तीय समजले जात आहेत, शिवसेनेच्या विजयी झालेल्या सर्व सदस्यांचे सत्कार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला

Previous articleआंबेगाव तालुक्यात ४२ बायोगॅस सयंत्र उभारणीचे उद्दिष्ट-गटविकास अधिकारी जालिंदर पठारे
Next articleसंतोष कांचन यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड