आंबेगाव तालुक्यात ४२ बायोगॅस सयंत्र उभारणीचे उद्दिष्ट-गटविकास अधिकारी जालिंदर पठारे

सिताराम काळे, घोडेगाव

पुणे जिल्हा परिषदे मार्फत नविन राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आंबेगाव तालुक्याला ४२ बायोगॅस सयंत्र उभारणीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी आंबेगाव पंचायत समिती कृषी विभागातील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी) व ग्रामसेवक यांच्याषी संपर्क साधावा, असे आवाहन गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी केले आहे.

आंबेगाव तालुक्यातील लाभार्थ्यांमध्ये ३५ सर्वसाधारण, १ अनुसुचित जाती व ६ अनुसुचित जमाती असे ४२ बायोगॅस सयंत्र उभारणीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यासाठी अनुदान मर्यादा प्रत्येक सयंत्रास १२ हजार रूपये, सर्वसाधारण संवर्गाकरीता १३ हजार रूपये, अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती संवर्गाकरीता शासननिधीतून व जिल्हा परीषद निधीतून दहा हजार रूपये प्रवर्गासाठी असुन असे एकुण बावीस हजार व तेवीस हजार सर्वसाधारण व अनुसिचित जाती व अनुसुचित जमाती अनुदान मिळणार आहे. तसेच शौचालय जोडणी केल्यास एक हजार सहाशे रूपये अतिरिक्त दिले जाणार आहे. यासाठी लाभार्थी यांनी प्रथम सदर काम स्वखर्चाने पुर्ण करावयाचे आहे. त्यानंतर अनुदान खात्यावर जमा केले जाणार आहे.

या योजनेसाठी शेतक-यांनी पुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, संबंधित अर्जदाराकडे किमान दोन जनावरे असावीत, बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी लाभार्थीकडे स्वतःच्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे, आधार लिंक केलेले बॅंक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स व रेशनकार्ड झेरॉक्स आदि कागदपत्रे आवश्यक असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी सांगितले.

Previous articleसलग सात वेळा निवडून येण्याचा अशोक दादा राक्षे यांनी केला विक्रम
Next articleशेवाळवाडी गावात शिवसेनेला भगवा फडकविण्यात यश