महाळुंगे ( इं) शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

महाळुंगे -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळुंगे (इं) येथे आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे निमित्त साधून शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांना उत्तम मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शाळेच्या सांस्कृतिक,कलात्मक क्षेत्रातील यशाबरोबरच, बौद्धिक क्षेत्रात देखील नावलौकिक वाढविण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी केलेले शैक्षणिक काम कौतुकास्पद आहे.या यशामागे खेड तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे,शिक्षण विस्ताराधिकारी जीवन कोकणे,बाळकृष्ण कळमकर यांची कायम मिळणारी प्रेरणा,शिक्षकांच्या पाठीवर असणारी कौतुकाची थाप,त्याचप्रमाणे वेळोवेळी केलेले मोलाचे अचूकपणाचे मार्गदर्शन आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.दत्तू भालचिम यांनी केले.जिल्हा शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी रेश्मा ठाकूर,आयुषकुमार विश्वकर्मा ,त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सुलभा शिवले,राहूल लोखंडे,वंदना यादव यांचा यथोचित सन्मान साकुर्डी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.विठ्ठल सांगडे,महाळुंगे केंद्राच्या केंद्रप्रमुख सुगंधा भगत यांच्या हस्ते पार पडला.त्याचप्रमाणे मंथन परीक्षेत केंद्रापातळी वर उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक भाग्यश्री इनामदार,रेखा वाघ,अनिता कुटे यांचाही सन्मान करण्यात आला.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे एक छोटासा गुणगौरव समारंभ मोजक्याच लोकांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.शितल कड मॅडम यांनी केले,श्रीम.जयश्री उमाप यांनी उपस्थितांचे आभार मानले

Previous articleनिधन वार्ता- रवींद्र फडके यांचे निधन
Next articleवाकळवाडीची उच्चशिक्षित शिवराज्ञी पवळे ठरली राज्यातील सर्वांत तरुण सदस्य