चाकण औद्योगिक परीसरात खंडणी मागणारा सराईत गुन्हेगार अटकेत

चाकण- कंपनी सुरू असलेले डेव्हलपिंगचे काम मला दे, नाहीतर मला महिन्याला ५० हजारांची खंडणी दे अशी धमकी देत सहा जणांनी मिळून एका व्यावसायिकाला मारहाण केली. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

संतोष मधुकर मांजरे (वय २९, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह नारायण घावटे (रा. शेलू, ता. खेड), सोन्या (पूर्ण नाव-पत्ता माहिती नाही) आणि अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विजय शिवाजी राऊत (वय ३१, रा. भांबोली, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संतोष मांजरे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने २०१३ साली दोन व्यक्तींचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केला होता. त्यात त्याला अटक झाली होती. सन २०१९ पर्यंत तो येरवडा कारागृहात होता.कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारीचे सत्र सुरू केले. पोलिसांनी त्याची पुन्हा कारागृहात रवानगी केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताञय गुळींग , उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस हवालदार चंदु गवारी, राजु कोणकेरी, अमोल बोराटे, पवन वाजे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामन सांगडे, शरद खैरे यांनी केली आहे.

Previous articleसावरदरी ग्रामपंचायत वर श्री गोंधळजाई परिवर्तन पॅनलची सत्ता
Next articleनिधन वार्ता- रवींद्र फडके यांचे निधन