सावरदरी ग्रामपंचायत वर श्री गोंधळजाई परिवर्तन पॅनलची सत्ता

Ad 1

चाकण- उद्योग नगरी सावरदरी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठ्या चुरशीच्या लढतीत पॅनल प्रमुख मा.सरपंच संजय चौधरी यांच्या श्री गोंधळजाई विकास आघाडी पॅनलचा ,उद्योजक सोमनाथ तरस यांच्या श्री गोंधळजाई परिवर्तन पॅनलने ०.७ असा पराभव केला.

तालुक्याचे लक्ष लागलेल्या सावरदरी ग्रामपंचायत निवडणूकीत दिग्गज उमेदवार पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रविंद्र गाढवे यांचा मनसे तालुकाध्यक्ष पै.संदिप पवार यांनी एक मताने पराभव केला.

तसेच रेणूका शेटे, जानता पवार, अंजना मेंगळे ,प्रमिला मांजरे ,गणेश तरस, लालु मेंगळे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे.सावरदरी ग्रामस्थांनी या वेळी तरुणांना संधी दिलेली आहे.

भरत तरस, संदिप पवार, संदिप मेंगळे, ताराबाई शेटे, बारकाबाई गावडे,मिराबाई कदम,निता शेटे या सर्व उमेदवारांना निवडून येण्यासाठी  तरुण कार्यकर्ते व गावातील जेष्ठ नागरिकांनी विशेष प्रयत्न  केले.