श्री संत यादवबाबा प्रगती पॅनेलचे १० उमेदवार विजयी आण्णासाहेब महाडिक गटाला घवघवीत यश

उरुळी कांचन

उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामपंचायत निवडणुकीत मध्ये अनेक दिग्गजांना दणका वार्ड क्र. एक- अमित भाऊसाहेब कांचन, स्वप्निशा आदित्य कांचन व मिलिंद तुळशीराम जगताप. वार्ड क्र. दोन – राजेंद्र बबन कांचन, अनिता सुभाष बगाडे व ऋतुजा अजिंक्‍य कांचन. वार्ड क्र. तिन – सुनील आबुराव तांबे व सायली जितेंद्र बडेकर. वार्ड क्र. चार- संतोष हरिभाऊ कांचन व मयूर पोपट कांचन तर सीमा दत्तात्रय कांचन (बिनविरोध). वार्ड क्र. पाच- संचिता संतोष कांचन, अनिता भाऊसाहेब तुपे व शंकर उत्तम बडेकर. वार्ड क्र. सहा- भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, प्रियंका ओंकार कांचन (पाटेकर) व सुजाता चंद्रकांत खलसे.

शिंदवणे (ता.हवेली) ग्रामपंचायत निवडणूकित आण्णासाहेब महाडिक गटाने वर्चस्व कायम राखत श्री संत यादवबाबा प्रगती पॅनेलचे १० उमेदवार विजयी झाले. आण्णा महाडिक गटाने शिवछत्रपती ग्रामविकास पॅनेल चा १० – १ ने दारुण पराभव केला व जय मल्हार विकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले.

सोरतापवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत निवडणूक मध्ये अनेक वर्षानी सत्ता बदल वार्ड क्रमांक एक – शंकर ज्ञानोबा कड, सुप्रिया देवेंद्र चौधरी, रविंद्र मोहन गायकवाड (सोरतापेश्वर पॅनेल). वार्ड क्र.दोन – विलास शंकर चौधरी, स्नेहल विठ्ठल चौधरी, सुनिता कारभारी चौधरी (भाई के.डी. चौधरी पुरोगामी ग्रामविकास पॅनेल). वार्ड क्रमांक तिन – निलेश विठ्ठल खटाटे ,पुनम नवनाथ चौधरी (शिवशंभो आघाडी), अश्विनी चंद्रकांत शेलार (पुरोगामी पॅनेल). वार्ड क्रमांक चार – विजय सर्जेराव चौधरी, मनिषा नवनाथ चौधरी, सोनाली नागनाथ लोंढे (पुरोगामी पॅनेल). वार्ड क्रमांक पाच – सनी पोपट चौधरी, संध्या अमित चौधरी व शशिकांत दशरथ भालेराव (सोरतापेश्वर पॅनेल). सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व पुरस्कृत शिवशंभो ग्रामविकास आघाडीची प्रचाराची यंत्रणा राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते रामदास चौधरी , पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हा अध्यक्ष सोनबा चौधरी, बाळासाहेब चोरघे, राजेंद्र चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सरपंच सुदर्शन चौधरी व युवा नेते सागर चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भाई के. डी. चौधरी पुरोगामी ग्रामविकास पॅनेलला सात जागांवर समाधान मानावे लागले.

कोरेगावमुळ (ता.हवेली) ग्रामपंचायत निवडणूक मध्ये महाविकास आघाडीला दणदणीत विजय वार्ड क्र. एक – भानुदास जेधे (महाविकास आघाडी) , वैशाली सांवत (महाविकास आघाडी), वार्ड क्र. दोन – दत्तात्रय काकडे (महाविकास आघाडी), राधिका काकडे (महाविकास आघाडी), लिलावती बोधे (महाविकास आघाडी), वार्ड क्र. तीन – मनिषा कड, मंगल पवार ( महाविकास आघाडी) , सचिन निकाळजे (महाविकास आघाडी), वार्ड क्र. चार – विठ्ठल शितोळे (महाविकास आघाडी – बिनविरोध), बापुसाहेब बोधे ( महाविकास आघाडी – बिनविरोध), पल्लवी कड (महाविकास आघाडी – बिनविरोध), वार्ड क्र.पाच – मंगेश कानकाटे (भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल – बिनविरोध) ,पल्लवी नाझिरकर (भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल – बिनविरोध). कोरेगावमुळ ग्रामपंचायत इतिहास मध्ये प्रथमच पती – पत्नी निवडून आले हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बापुसाहेब बोधे यांच्या सुविद्य पत्नी लिलावाती बोधे. महाविकास आघाडीचे नेतृत्व विठ्ठल शितोळे, बापुसाहेब बोधे, आप्पासाहेब कड, जयसिंग भोसले, प्रकाश काकडे, विठ्ठल कोलते, सचिन कड ,आजी – माजी पदाधिकारी यांनी एकजूटीने मेहनत घेतली.

Previous articleगाव कारभाऱ्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा; जय-पराजय विसरुन ग्रामविकासासाठी एकत्र या -उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleश्री संत यादवबाबा प्रगती पॅनेलचे १० उमेदवार विजयी आण्णासाहेब महाडिक गटाला घवघवीत यश