दौंडमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुका मुख्याध्यापक संघ, डॉ. हेडगेवार स्मृती समिती, दौंड, MKCL व रोटरी क्लब आँफ दौंडच्या वतीने माध्यमिक शालांत परीक्षा इ. १० वी. व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा १२ वी मधील प्रत्येक शाळेतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच केद्रात प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,कोरोना च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन हा कार्यक्रम दोन टप्यात घेण्यात आला,हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो या वर्षी शासनाच्या नियमानुसार कोरोना चे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला,

रविवार दि. १७. १.२०२१ रोजी गणेश हाँल रेल्वे इन्स्टिट्यूट रेल्वे स्टेशन जवळ, हुतात्मा चौक, दौंड येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे सर्व नियमांचे पालन करुन खालील वेळापत्रका प्रमाणे कार्यक्रमाचे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते

पाटस ते राहू (पश्चिम भाग) सकाळी १० वा.
दौंड शहर ते खानोटा (पुर्व भाग) दुपारी २ वा.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव आदिनाथ थोरात, मुख्याध्यापक संघाचे प्रसाद गायकवाड, विनायक सुंभे, रामचंद्र म्हेत्रे रोटरी क्लब आँफ दौंडचे हरिश्चंद्र ठोंबरे,रो शालिनीताई पवार,रो. संजय इंगळे रो. उल्हास मिसाळ , रो.पुजा बिडकर, डाँ. हेडगेवार समितीचे दिलिप लोकरे,सुनील भुजबळ ँड. सुधीर गटणे उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. हेडगेवार स्मृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिनोलीकर यांनी तर सुत्रसंचालन मुख्याध्यापक संघाचे सचिव रामचंद्र नातू यांनी तर आभार राजेंद्र थोरात यांनी मानले.

Previous articleवारूळवाडी ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये गणपीर बाबा पॅनलचे 10 उमेदवार विजयी:भागेश्वर पॅनलच्या सात उमेदवारांचा विजय
Next articleगाव कारभाऱ्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा; जय-पराजय विसरुन ग्रामविकासासाठी एकत्र या -उपमुख्यमंत्री अजित पवार