निरगुडसर गावात सापडले १२ कोरोना बाधित रुग्ण ; चार दिवस गाव राहणार बंद

प्रमोद दांगट, निरगुडसर

गेल्या चार पाच दिवसात निरगुडसर गावात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून गावा कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निरगुडसर ग्रामपंचायत प्रशासनाने पुढील चार दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना मुक्त झालेल्या निरगुडसर गावात काही दिवसापूर्वी झालेल्या लग्नसमारंभात बाहेरून आलेल्या पाहुणे / मित्रमंडळी मुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचे बोलले जात होते.त्यामुळे ही वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी निरगुडसर ग्रामपंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने गावातील नागरिकांना कोरोना तपासणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. दरम्यान प्राथमिक रुग्णालय निरगुडसर येथे शनिवार दि.१६ रोजी झालेल्या तपासणीत ७७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यात १२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह सापडले आहेत.

गावात गेल्या पाच सहा दिवसात २० ते २२ रुग्ण सापडले असून यातील बरेच रुग्ण झालेल्या लग्नात उपस्थित होते.अचानक वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निरगुडसर ग्रामपंचायत प्रशासनाने गाव पुढील चार दिवस ( बुधवार दिनांक २० पर्यंत बंद ) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यकाळात गावातील अत्यावश्यक सेवा मेडिकल ,दवाखाने ,वगळता सर्व हॉटेल, भाजीपाला, केशकर्तनालय,पान टपरी व इतर दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

Previous articleआळंदी-शहीद राजेंद्र किर्वे प्रतिष्ठानच्या वतीने फिजिओथेरपी व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
Next articleश्री क्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ