आळंदी-शहीद राजेंद्र किर्वे प्रतिष्ठानच्या वतीने फिजिओथेरपी व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

आळंदी : संघर्ष फौंडेशन संचालित शहीद राजेंद्र किर्वे प्रतिष्ठानच्या वतीने आळंदी शहरातील नागरिकांसाठी फिजिओथेरपी व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आळंदी येथील मोरया हेल्थकेअर सेंटर येथे करण्यात आले होते. या आरोग्य शिबीर चे उदघाटन माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील,माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे,माजी नगरसेवक अशोक उमरगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी मोरया हेल्थकेअर सेंटर चे प्रितम किर्वे, भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे नेते हभप संजय महाराज घुंडरे,नगरसेवक पांडुरंग वहीले,भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे,दिनेश कुऱ्हाडे,सुनिल रानवडे,अविनाश बोरूंदिया,नित्यानंद कुर्‍हाडे,आनंद वडगावकर,सतिष कुऱ्हाडे,बंडुनाना काळे,माऊली बनसोडे,संतोष घुंडरे,भागवत काटकर,बाळासाहेब किर्वे उपस्थित होते.

भाजप नेते संजय घुंडरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की असे उपक्रम हे नेहमी करण्यात यावे रुग्णसेवा हेच ईश्वरसेवा आहे.असे आरोग्य शिबीर प्रितिम किर्वे यांच्या माध्यमातून नेहमी होत असतात.त्यात रुग्णाची रक्त लघवी व फिजिओथेरपी केली जाते ही आनंदाची गोष्ट आहे.मी यांचे मनापासून कौतुक करतो व असे आरोग्य शिबीर घेत राहावे.
फिजिओथेरपी विभाग कडून पाठ दुखी, मणक्याचे आजार व असे विविध आजारांवर फिजिओथेरपी करण्यात आले. यावेळी डॉ.पुजा कोरडे आणि डाॅ.सरोज अंबिके यांनी फिजिओथेरपी वर मार्गदर्शन केले व रुग्णांवर उपचार केले.

या आरोग्य शिबिरात अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वते साठी सुप्रिया फडताळे,फरजान नदाफ,ज्ञानेश्वर कोकनर,श्रेयश खरगे व हॉस्पिटलच्या पूर्ण स्टाफने परिश्रम घेतले.

Previous articleग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक / रॅली काढल्यात होणार कारवाई
Next articleनिरगुडसर गावात सापडले १२ कोरोना बाधित रुग्ण ; चार दिवस गाव राहणार बंद