ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक / रॅली काढल्यात होणार कारवाई

प्रमोद दांगट, निरगुडसर

आंबेगाव तालुक्यात पार पडलेल्या २५ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी / निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कुणी गर्दी जमवू नहे तसेच कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नहे म्हणून उमेदवाराने मिरवणूक किव्हा रॅली काढल्यात त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी प्रत्येक तालुक्यातील पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार तालुक्यात दिनांक 18 रोजी विजयी उमेदवार व त्यांच्या पॅनलच्या कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन उमेदवाराची कुठलीही विजय मिरवणूक रॅली काढू नये तसेच पराभूत उमेदवारच्या घरासमोर फटाके वाजवणे ,विरोधी गटातील कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल उधळणे ,परवानगीशिवाय बॅनर लावणे ,असे कृत्य करू नये असे कृत्य केल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

तसेच दिनांक 18/1/2021 रात्री दहा ते दिनांक 19/1/2021 रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व हॉटेल, ढाबे ,खानावळी,चायनीज सेंटर, पान टपरी ,यांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

दरम्यान प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी कडक केली जाणार असून त्याचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल असे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी सांगितले आहे.

Previous articleयुवा उद्योजक संतोष उर्फ दादा देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख
Next articleआळंदी-शहीद राजेंद्र किर्वे प्रतिष्ठानच्या वतीने फिजिओथेरपी व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन