युवा उद्योजक संतोष उर्फ दादा देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख

राजगुरूनगर श्री संतोष उर्फ दादा यल्लप्पा देवकर एक युवा उद्योजक ,एक यशस्वी आणि अगदी शुन्यातुन विश्व निर्माण करणारा दादा देवकर .दादाचा जन्म वडार समाजील घरात अठरा विश्व दारीद्र्य .अगदी अलीकडच्या काळात म्हणजे दहा वर्षापुर्वी हा दादा शेळ्या चारायचे काम करायचा. जेमतेम शिक्षण घरात सर्वात लहाण दादाच याांच्या पेक्षा मोठे पाच भाऊ आणि एक बहिण.

पाच नंबरचा भाऊ पांडुरंग देवकर चांगला शिक्षण घेत होता बाकिचे भाऊ रोडच्या कामावर दगड फोडायचे काम करायचे .दादा लहाण म्हणून त्याला एक तीन चाकि टेम्पो घेऊन दिला होता.

मला आठवतय दादानी मला विचारले होते भाऊ गाडी घेतोय कुठे धंदा मिळेल का ?

मी सांगितले कंपणीत नाय रे कुठे धंदा पण जर तुझी तयारी असेल तर आपल्या गावात आणि खेडमधे खुप धंदा आहे फक्त करणारा पाहिजे.
दादानी गाडी घेतली खुप कष्ट केले आणि बघता बघता भाऊ नागनाथ देवकर , शहाजी देवकर आणि पांडुरंग देवकर यांच्या साथीने प्रगती करत करत प्रगती डेव्हलपर्स आणि जय अंबिका कस्ट्रक्शन या नावाने व्यवसाय चालु करुन उत्तुग भरारी घेतली.
एक झोपडीत राहणारा पोरगा एसी गाडीत फिरायला लागला.

आणि बघता बघता दोन तीन पोकलेन मशीन आणि ट्रेलरचा मालक झाला आणि आज रोजी तो आमच्या गावच्या ग्रामपंचायत मधे विद्यमाण ग्रा. सदस्य म्हणून काम करत आहे . आणि एवढ सगळे असुन सुद्धा आमचा दादा अजुनही जमिणीवर आहे ही बाब आमच्या साठी महत्वाची आहे.
अशा ह्या आमच्या श्री संतोष उर्फ दादा देवकर या मित्रास जन्मदिवसाच्या कोटि कोटि शुभेच्छा आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना

Previous articleअमली पदार्थाचा विळखा तरुणाईला धोकादायक – आमदार चेतन तुपे
Next articleग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक / रॅली काढल्यात होणार कारवाई