अमली पदार्थाचा विळखा तरुणाईला धोकादायक – आमदार चेतन तुपे

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन –

तरुणांनी अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे या उद्धेशाने फौंडेशन फॉर ड्रग फ्री वर्ल्ड या संस्थेद्वारे अमली पदार्थ विरोधी जागृती अभियान संपूर्ण पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याद्वारे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती ,समाजसेवक, डॉक्टर, पोलीस, पत्रकार , शासकीय अधिकारी यांना या अभियानामध्ये सामावून घेऊन समाजामध्ये अमली पदार्थ विरोधी चळवळ सुरु करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे असे अमली पदार्थ विरोधी जागरुकता अभियानाचे स्वयंसेवक प्रवीण मोरे यांनी सांगितले .

या अभियानाअंतर्गत हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांना याची माहिती देण्यात आली. व अभियानास प्रारंभ करण्यात आला. ” आज तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता व अमली पदार्थाचे होणारे वाढते सेवन लक्षात घेता अमली पदार्थाचा विळखा आजच्या तरुणाईला विकासापासून दूर नेऊ शकतो . असे चेतन तुपे यांनी सांगितले व या अभियानास चेतन तुपे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी या अभियानाचे स्वयंसेवक प्रवीण मोरे यांनी चेतन तुपे यांना माहितीपर पुस्तिका आणि सी डी भेट दिली.